Saturday, November 3, 2012

कारण प्रेम प्रेम असतं ……………?

प्रेमात पडणं सोप्पं असतं पण शेवटपर्यंत टिकवणं खूप अवघड असतं....
प्रेमात वचनं देणं सोप्पं असतं पण ती निभावनं कठीण असतं....
प्रेमात दिवसरात्र एकमेकांशी बोलणं सोप्पं असतं
 पण विरह सहन करणं अशक्य असतं....
 प्रेम करणं सोप्पं असतं
पण प्रेम विसरणं शक्य नसतं....
प्रेमात जगण्यासाठी वचनं द्यायची असतात,
पण शपथा देवून जीवाला बरं वाईट करून घेवू नकोस असं म्हणायची वेळ येवून द्यायची नसते....
 प्रेम जगण्यासाठीकरायचं असतं, आणि प्रेमातच जगायचं असतं....
प्रेमासाठी मरून प्रेमाचा अपमान करायचा नसतो....
 कारण प्रेम प्रेम असतं ……………?

No comments:

Post a Comment